श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

रामभाऊ 1952 साली त्यावेळच्या अकरावीच्या मॅटिकच्या परीक्षेला चित्रकला 'डॉइंग) विषय घेऊन बसले. आणि काय आश्चर्य नव्हे चमत्कार त्यांना त्यात एकमेव प्राविण्य मिळाले. संपुर्ण नागपुर बोर्डात चित्रकला विषयात प्राविण्य मिळविणारे हे एकमेव परीक्षार्थी होते. त्यापुर्वी दहा वर्षे हे प्राविण्य कोणाला ही मिळाले नव्हते. मॅटिक झाल्याबरोबर रामभाऊ नागपुरच्या एका हायस्कुल मध्ये डॉइंग मास्तर म्हणुन नोकरीला लागले. दुर्सयाच वर्षी बुलडाण्याच्या सरकारी हायस्कुल मध्ये डॉइंग मास्तर म्हणुन नोकरी मिळाली. एकदा अकोल्याचे विभागीय शिक्षण अधिकारी श्री बक्षी बुलडाणाच्या सरकारी हायस्कुलला भेट देण्यासाठी गेले. त्यांना हीच्या इमारतीचा विस्तार व नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संपुर्ण आवाराचा व उभ्या असलेल्या इमारतींचा नकाशा तातडीने हवा होता. प्रयत्नांची पराकाष्टा करूनही त्या विषयातील तज्ञ अधिकारी मिळाला नाही. त्योवळी रामभाऊ पुढे झाले. त्यांनी दोन अडीच तासात मोजमाप घेऊन अगदी प्रमाण बध्द बिनचूक नकाशा काढून दिला. श्री बक्षी साहेबांना खूपच आश्चर्य आणि कौतूक वाटले. ते आकोल्यास परत आले आणि आकोल्याच्या तांत्रिक शिक्षणाच्या हायस्कूल मध्ये तांत्रिक विषयाचे डनइंग मास्तर म्हणुन रामभाऊंच्या नेमणुकीचा हुकुम बुलडाण्यास पाठवीला. नोकरीत असलेले इतर सर्व प्रशिक्षित वरीष्ठ डनइंग मास्तर मागे राहिले. हा चमत्कार नाही का

 

 

मागील पान           पुढील पान

 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org