श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

बीज रूपाने दत्त भक्ति आणि दत्त भावना सोबत घेऊन ज्यांच्या पोटी श्रीरामभाऊ यांनी जन्म घेतला ते आमचे आई वडील अत्यंत ईर भत होते. देवधर्मव्रत वैकल्येसणवारभजन पूजन हे सर्व अत्यंत निष्ठेने करीत.आम्हा इतर भावंडा पेक्षा आई वडिलांचा सहवास रामभाऊंना अधिक लाभला. त्यामुळे रामभांऊचा ओढा धार्मिक गोष्टी कडे अधिकाधिक वाढत गेला. पंचाववीस वर्षापूर्वी अकोल्याच्या भागवत प्लॉट मध्ये श्री फडणिसांच्या घरात राहत असतांना रामभांऊचा श्री गुरूचरित्राचा सप्ताह चालू होता. चौथा दिवस होता. भल्या पहाटे वाचन चालू होते. काही स्त्री पुरूष ऐकण्यासाठी बसले होते. त्यात आमचे आईवडील व सौ. नातू वहिनी होत्या. वाचतांना रामभांऊना एकदम संचार झाला. रामभाऊचे स्वरूप बदलून गेले. त्या एकंदर प्रकाराने सर्वांना खूप आश्चर्य वाटले. त्यातही चमत्कार असा कीरामभाऊ श्री दत्तमहाराजांच्या भूमिकेत ओवीबध्द बोलू लागले. गुरूचरित्रातील पाठ केलेल्या ओव्या नव्हेत. स्वतंत्र विचाराच्या कोठेही न लिहिल्या गेलेल्या ओव्या. त्या चमत्काराने सर्वजण थक झाले. त्या दिवसा पासून आज पंचाववीस वर्षे झाली आहेत दर गुरूवारी श्री दत्तांच्या पूजा आरतीला अनेक भाविक आवर्जून उपस्थित असतात. आरतीच्या वेळी रामभाऊंना श्री दत्तगुरूचा संचार होतो. श्रीरामदत्तांचा आशिर्वाद आणि उपदेश घेणारांची अक्षरर्श चढाओढ लागते. श्री रामदत्तांच्या भतांमध्ये सर्व सामान्य लोक तर आहेतच पण त्यात नामवंत डॉटर वकील इंजिनियर पोलिस अधिकारीन्यायाधीशशिक्षक़व्यापारीबँकांचे अधिकारी क़ारखानदार अशा सर्व स्तरातील/क्षेत्रातील मान्यवर यतीआहेत.महाराष्टनत आणि महाराष्टन बाहेर दत्त महाराजांचे अनेक भत आहेत.श्री रामदत्त महाराज चमत्कारी बाबा नाहीत. तुमच्या कोरडया विहिरीला पाणी येईलवाळलेल्या झाडाला पाने येतीलवांझ गाय दूध देईल असे चमत्कार ते कधीही करीत नाहीत पण संचार चालू असतांना किंवा विशिष्ठ प्रकारचे ध्यान करून ते जे काही बोलतात ते प्रत्यक्षात खरे होते असा आजवरचा सर्वांचा अनुभव आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटातून भक्तांना बाहेर काढायचे आणि त्यांचे जीवन जास्तीत जास्त सुखी आणि समाधानी करायचे हा श्री रामदत्तांचा सतत प्रयत्न असतो. याचा अनुभव तर अनेकांना आला आहे. त्यापैकी काही सत्य घटना यअनुभवीच जाणती....' या सदरामध्ये शेवटी दिल्या आहेत.

श्री रामदत्तांच्या घरी प्रत्येक गुरूवार हा जणूं एक सणच असतो. उत्सव असतो असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या कडील श्री दत्त जयंती व गुरूपौणिमा या उत्सवांचे वर्णन करण्यास शद्ब अपूरे पडतील. त्या उत्सवांना प्रत्यक्ष उपस्थित राहूनच अनुभव घ्यायला हवा.श्री दत्त महाराजांच्या दरवाज्यावर भेटण्याच्या वेळा संबंधीचा फलक लावलेला आहे. पण सा घेण्यास येर्णायांची व दर्शनार्थींची वर्दळ अक्षरर्शदिवसभर चालू असते.कधी कधीतर श्री महाराजांना जेवणासाठी सुध्दा वेळ मिळत नाही. असे असले तरी कोणासही भेटल्या शिवाय आणि त्यांच्याशी सविस्तर बोलल्या शिवाय विन्मुख परत जाऊ न देण्याचा महाराजांचा कटाक्ष आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात श्री रामदत्त महाराजांचा लौकिक खूपच मोठा आहे. अनेक नामवंत मान्यवर संत महात्मे श्री महाराजांकडे येऊन गेले आहेत. त्यामध्ये इंदूरचे प.पू.श्रीनाना महाराज तराणेकरसाखरखेडर्याचे प.पू.प्रल्हाद महाराज़पुण्याचे प.पू.श्री दत्तमहाराज कविश्वर घळीचे प.पू.मामा गांगल यांचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो. अशा या असामान्य व्यतिमत्व असलेल्या प.पू.श्रीरामदत्त प्रभूचा चरित्र ग्रंथ अकोल्याच्या सौ.ताई देशपांडे यांनी लिहून फार मोठे सत्कार्य केले आहे. ही खरी लोकसेवा आहे.श्री महाराजांवरील श्रध्देचे हे खरे प्रतिक आहे. सौ.ताईंनी श्री रामदत्तांच्या संबंधी काही गीते अभंग़ श्लोक़ अष्टके आरत्या असे विविध प्रकारचे लिखाण केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे.हे श्री रामदत्त महाराजांच्या कृपेचे आणि आशिर्वादाचे फळ आहे. हि दुसरी आवृत्ती प्रसिध्द करण्यासाठी श्री रामदत्त महाराजांचे निष्ठावान परम भत प्राध्यापक श्री मिलिंद पांडे श्री संत गजानन महाराज इंजिनियरिंग कॉलेज़शेगाव यांनी पुढाकार घेऊन छापण्याची व्यवस्था केली आहे.

॥  ॐ  ॥ 

॥  श्री  गणेशगुरूभ्योनम:  ॥  श्रीगुरूशरणम:  ॥ 

(श्रीगुरूदेव  दत्तमहाराज  पदी  शरणम:  )

 

मागील पान           पुढील पान

 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org