श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

जी मंडळी मानस्मरण करीत अन्य ठिकाणी बसली होती ती सर्व मंडळी पुन्हा सोबत आली आणि आम्ही प्रदक्षणा घालू लागलो. उत्स्फूर्त नामस्मरण होत असल्यामुळे त्यांत भाव प्रतीत होत होता. महाराज समर्थ आहेत. भक्तीभाव आणि दाभिंकपणा ओळखायला. पुन्हा प्रसादवृष्टी झाली, सर्व वेचू लागले. प्रत्येकाच्या मुखी होते ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा '' !
अरूंद जागा, डाव्या बाजूची भिंत आणि चौकोनी ओटा यामुळे मिळणा-या जागेत आपला प्रदक्षणे करिता कसा यिरकाव करून घेता येईल याची प्रत्येकजण दखल घेत होता. जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. अर्थात सगळयांनाच प्रदक्षणा जास्तीत जास्त घालण्याची जिज्ञासा त्यामुळे त्यांच्या अतिउत्हासाला अधूनमधून जागा करून देण्याकरिता बाजाला उभे राहून नामस्मरण करीत होते. वेळ आनंदात जात होता. मधूनच प्रसाद येत होता काजूचा!
पुन्हा मंदीराच्या खोलीत यावं, ग्रंथ ऐकत बसावं, वाटल्यास नामस्मरण करावं प्रत्येक जण वाचन करणारा आतुरतेने वाट पहात होता. आपल्या सेवेची हजेरी केव्हा लागते म्हणून. 10-30 ते 11 चा सुमार असेल. डोळे मिटून शांत चित्ताने महाराजांचे स्मरण करीत होतो. कांही वेह ह्या अवस्थेत गेला असेल. तोच उजव्या मांडीवर कांही तरी पडल्याच जाणवलं. डोळे उघडले! काय आहे  म्हणून उचलून पाहिलं सदगुरूंचा कृपा प्रसाद, आणि जो अंगावर धारण केल्यावर मानव उध्दरून जातो असे ज्यांचे महात्म्य आहे असा तो 'रूद्राक्ष'  होता. प्रसादच तो ! अमोल किमतीचा ! त्याला महांराजांच्या दिशेकडे धरून विनम्र भावाने नमस्कार केला आणि यज्ञोपविताला अडकवून घेतले. प्रत्येक जण उत्सुकतेने येऊन पाहून जात होता. करपल्लवी आणि डोळयाने खुणा करून विचारत होता. कुठे आहे तो कृपा प्रसादाचा रूद्राक्ष. कारण पोती वाचन चालू असल्यामुळे तेथील पवित्र आणि शांत वातावरण आपल्या बोलण्याने बिघडू नये याची लहान थोर काळजी घेत होते.
दुपारची पूजा श्री भाऊसाहेब देशपांडे करीत होते आणि बेल फूल वाहून महाराजांचे चरणी सेवा करीत होते. अकोल्याहून नेलेल्या फुलांच्या माळा, हार त्यांचे तसबिरीला घालण्या करता दिले. त्या दिवशी महाराजांनी ते आनंदाने स्विकारल्या सारखे दिसले. कारण त्यानंतर पुन्हा औदुंबराच्या सांनिध्यात गेल्यावर कृपाप्रसाद आला हीच त्यांची पावती पुज्य महाराजांनी दिली अशी समजूत या आज्ञानी मानवाने करून घेतली तर त्यात चूक होणार नाही अस वाटतं !
महाराजांच्या सानिध्यात भूक तहान जाणवली नाही, सर्व लोकांचे लक्ष क द्रीभूत झालं होत महाराजांच्या सेवेत. परमेश्वरी शक्ती एकच आहे, भिन्नपणा आहे तो आपल्या दृष्टीत. म्हणून आपण त्याच शक्तीला निरनिराळया स्वरूपात आणि आकारात पाहात बसलो आणि ओळखतो हे आपल्या अज्ञानतेमुळे! श्री गजानन महाराज, श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि श्री रेणुका यांचे नितांत वास्तव्य असलेल्या तया स्थळी सगळयांचाच प्रसाद मिळायचा म्हणून की काय इतर प्रसादा बरोबर श्री माहुरगडवासीनी श्री रेणुकेच्या श दूर (खोळीचा एक तुकडा) प्रसाद म्हणून वृक्षाखाली मिळाला. त्या ठिकाणी वास्तव्य असल्याची हीच ती साक्ष!
दुर्मिळ असे ते प्रसाद उचलून खात्री करून आणि श्री जगदंबेला नमस्कार करण्याकरिता पुन्हा देवघरात आलो. ग्रंथ वाचन चालू होतेच, कान ग्रंथाचे श्रवण करीत होते, मन म्हणत होते ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा '' याच वेळी कल्पवृक्षाखाली भजनाची हजेरी लावावी म्हणून सा-या भगिनी वर्गाने पंचपदी गायला सुरूवात केली. करूणा त्रिपादी सुरू झाली आणि करूणा वत्सल सवामी धाऊन आले. तृषार्ताला शांत करण्या करता. कारण त्रिपादी चालू असतांनाच महाराजांनी पुन्हा प्रसाद वितरण केले.त्यामुळे भगिनी वर्गाच्या आधीच्याच उत्साहात भरती आली. मग काय विचारता! टाळयांच्या तालावर लयबध्द ठेका घेत फेर धरल्या गेले आणि तन-मनाने एकाग्र होऊन भजनाशी समरस होऊन प्रदक्षणा होऊ लागल्या. वृध्दमाता आणि इतर समवयस्क आजी मावशींना प्रसाद आल्यावर लगबगीने धावपळ करून प्रसाद घेता येत नव्हता म्हणून की काय महाराज यांना ही विसरले नाही, त्या बसल्या होत्या त्यांच्या दिशेने सुध्दा प्रसाद टाकला गेला. अगदी हाताला येईल असा.  कृपावंत स्वामिंनी खरचं आम्हा अज्ञानी जीवावर कृपेचा आणि प्रसादाचा वर्षाव चालूच ठेवला होता.

 

 

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org