श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

इकडे मंदिरात बसून का कुणास ठाऊक पण डोळयावर झापड येऊ लागली कांही केल्या आवरेना ! म्हणून मंदिराच्या दरवाज्यातून बाहेर आलो आणि उजव्या हाताला लागुनच भिंतीशी पाठ टेकून बसलो.  क्षणभर डोळे मिटले गेले आणि श्री भाऊसाहेबांनी आवाज दिला अगदी जवळ बसून. काय झोप येते कां? ते शब्द ऐकले मात्र आणि डोळयावरची झापड एकदम नाहिशी झाली. सावरून बसलो आणि म्हंटलं, झोप नाही येत पण ही सुस्ती कांही आवरत नाही. वास्तवित सुस्ती यायला कांहीच कारण नव्हते. भाऊसाहेब जवळच बसले होते त्यांचेशी बोलण चालू होतं. यावेळी चौकाच्या बाजूच्या ओसरीत आम्ही दोघच होतो आणि मग सांगत होतो हे श्री भाऊसाहेब आहेत हे तू ओळखलं कां ? कांही क्षण गेले आणि त्या ठिकाणच्या चमत्काराबद्दल लोक कसकशा शंका घेत गेले आणि त्याचे निरसन लेखाच्या द्वारे कसे केल्या गेले हा मुख्य मुद्दा चर्चेला घेतला गेला. पुराव्या दाखल रजिस्टर मध्ये लिहून घेतलेले लेखाचे टिपण उघडून भाऊसाहेब दाखविणार होते. त्यांनी विशिष्ट पान काढून रजिस्टर समोर केलं. हे रजिस्टर हातांत घेऊन वाचणार इतक्यात सौ. सुशिलाबाई नातू उत्सुकतेने दरवाज्याजवळ येऊन विराजमान झाल्या. गंभर चर्चा ऐकावी ही त्यांची सद्इच्छा ! त्या येऊन बसल्या. रजिस्टर मधल्या आदेशाचे वाचन सुरू करणार इतक्यात अचानक एक मोठी वर्तमानपत्राच्या कागदाची पुडी रजिस्टरावर पडली. जरा चमकुनच वर पाहिलं कांही नव्हतं . भाऊसाहेब म्हटलं !  भाऊसाहेब पुडी कशाची आहे ते फक्त म्हणाले उघडून बघा! आणि त्यांनी स्मित केलं. अर्थ समजला ! पुडी उघडून पाहिली काय आश्चर्य त्यात महाराजांनी विभूती पाठविली होती   ''धन्य झालो ! '' उद्गार निघाले मुखातून !  पुडी पूर्ण उघडताच त्यात आंत कागदाची घडी आहे हे लक्षात आलं. श्री भाऊसाहेबांच्या आज्ञेने घडी उघडून पाहिली तर त्यांत कागदाचे दोन भाग व दोन भागावर अलग अलग मचकुर दिसला आदेश आला अजाणतां शब्द मोठयाने मुखातून बाहेर पडले.  क्षणार्धात सगळयांनी ही गोष्ट ऐकून एकच गर्दी केली आणि 'आदेश आले' एकच शब्द उमटला आणि सर्व म्हणाले - गुरूदेवदत्त !  गुरूदेवदत्त !. कागद वाचू लागले. एक होता मराठी भाषेतला आणि दुसरा होता हिंदीतला. हस्ताक्षर अत्यंतवळणदार आणि स्वच्छ होतं. प्रत्यक्ष श्री नृसिंहस्वामींचच हस्ताक्षर ते, मग काय? सर्वजण लेख उत्सुकतेन ऐकु लागले -

श्री गुरूमाऊली 
 
बाबारे   खरी तपस्या तीन गोष्टीवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे साधकाने सत्याची कास धरली पाहिजे. साधकाने सतरूपी खांबाला पकडून मगच इतर गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तृष्णेवर विजय मिळविला पाहिज तिसरी गोष्ट म्हणजे लौकिक सुखोपभोगाच्या इच्छा आकांशा टाळल्या पाहिजेत. वरील तिन्ही गोष्टींचे पथ्य पाळणे म्हणजेच खरी तपस्या होय. मनात उद्भवणा-या विषय वासनेवर विजय मिळविणे हेच त्यातील मुख्य आहे.
श्री भगवान 

भाई ! भगवान शरणागत वत्सलका माँ भाव बडा सुंदर है   जैसे गो आने (बछडके बदन पर लगे हुए मैलेको स्वयं अपनी जीभसे चाट चाट कर साफ करती है, उसे निर्मल बना देती है, और बछडे को देखकर पिन्हा जाती है, वैसेही भगवान आने भक्तोको पाकर प्रवित हो जाते है और उनके पापोका नाश कर देते है   प्रभू के प्रेमसे स्विकार करने मे उस वस्तूका महत्व नही है, महत्व है - भक्ती भावका.)
शब्द मोजके पण अर्थपूर्ण, किती अमोल उपदेश केला होता? परमेश्वर आणि भक्ताचे संबंध कसे असावे याचे उपदेश स्वामींनी स्वहस्ताक्षार, प्रसाद म्हणून दिले होते. प्रत्येक घटना चमत्कारीक घडत होती आणि मन अत्यानंदाने नाचत होते. कारण पूर्वी नुसते ऐकलेले सत्य आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. लेखाचे बरोबर आलेला अंगारा-विभूती सगळयांना देऊन, त्याचा लाभ सगळयांनी घेतला त्यामुळे तर मनाच्या समाधानाला पारावार राहिला नाही. ज्या विभूतीमुळे श्री गुरूचरित्री अत्यंज ज्ञातीतील मानवाला त्याचे सप्तजन्म आछवू शकले ती पवित्र विभूती मस्तकी धारण करणया करिता मिळत होती. विभूती लावून सगळयांनी पुन्हा एकदा स्वामींचा गजर केला. जयघोष केला. कल्पवृक्षाखाली भजनाचा कार्यक्रम चालूच होता म्हणून भगीनी वर्ग तिकडे गेल्यावर पूर्वींच्या लेखाचे थोडे वाचन केले. ते इतरांनी भक्तीभावानो श्रवण केले. ज्यावेळी लेखाचा प्रसाद आला त्यावेळी तर कांहीवेळ श्री भाऊसाहेबांचे जागी स्वामींचेच अस्तित्व जाणवले. पुन्हा क्षणभर भाऊसाहेब तर क्षणभर स्वामी  असा काही काळ गेला. ज व्हा लेख ऐकण्यास गर्दी झाली त्यावेळी श्री भाऊसाहेब उठून दूर निघुन जातांना दिसले. थोडयावेळाने परत आले ते मात्र भाऊसाहेबांचे सानिध्यात इतर पूर्वी आलेल्या लेखाचे वाचन करण्याचा प्रयत्न केला. पण मन अस्वस्थ होते कारण कांही वेळापूर्वीच्या भाऊसाहेबांचे सांनिध्य फारच कमी लाभू शकले म्हणून. अप्रत्यक्ष स्वामींच्या सांनिध्यात कांही क्षण कां होईना राहण्याचा लाभ झाला. हेच सार्थक झालं जन्माचे. आलेल्या अनुभवाचा आनंद काय वर्णावा. त्याच्या चरणी आपली अल्पबुध्दीची सेवा रूजू होते एवढाच याचा अर्थ !

 

 

 

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org