श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

कल्पवृक्षाचे दर्शन घेण्यास तेथे गेलो तर त्या पूर्वीच सुहासिनींनी सडासंमार्जन करून त्या भोवती रांगोळया काढून त्या इिकाणची पवित्रता व प्रसन्नता आणची वाढविली होती. नाम गजर सुरू झाला ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ''. लहान मुला पासून तो वृध्दीपर्यंत सर्वजण प्रदक्षिणा घालू लागले. मुखाने नामस्मरण करू लागले आणि स्वामींनी प्रात:काळी पुन्हा प्रसाद दिला-खडीसाखरं. यावेळ पर्यंत चांगलस फटफटल होत.  त्यामुळे प्रसाद उचलण्यास दिसत होता. औदुंबराचे दर्शन घेऊन पंचायतन असलेल्या महादेवाच्या स्थानाकडे वळलो. त्याठिकाणी आज तरी संगमश्वरी महादेवाची पिंड दिसत असली तरी त्याची हकीकत फार निराळी आहे. काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी औदुंबराचे झाड होते आणि त्या खाली प्रत्येक महाशिवरात्रीला आणि श्रावण मासपूर्ण रामेश्वराहून श्री रामेश्वर तया ठिकाणी येत असत. ते वालूकाचे लिंग रूप घेऊन ! विश्वास बसणार नाही कुणाचा ! पण सत्य आहे ही घटना,श्रावण मास संपला की आपोआप गुप्त व्हायची ती वाळूची पिंड ! पुन्हा दर्शन व्हायचं तया पिंडीच ते महाशिवरात्रीलांच ! अशा त्या ठिकणचं दर्शन घेऊन बेल वाहिला आणि पारायणाला सुरूवात करण्यापूर्वी त्यांचा आशिर्वाद घेतला.
ह्या पंचायतन असलेल्या ठिकाणी जवळच एक लहान दरवाजा आहे त्यातून आत गेलो. त्या खोलीत ध्यान धारणा करण्या करता श्री प्रभाकर महाराज बसत असतात.  श्री प्रभाकर महाराज हे श्री भाऊसाहेब देशपांडे यांचे चिरंजीव पण अधिकारी पुरूष ! वय फारस नाही आहे 35 ते 37 च्या दरम्यान पण आध्यात्मिक पीठ खूप ! प्रत्यक्ष नृसींह सरसवती स्वामींशी एकांतात चर्चा करण्याचं स्थान म्हणजे श्री प्रभाकर महाराजाची ती ध्यान धारणेची लहान खोली. त्यात असलेल्या श्रीनृसिंहसरस्वती स्वामी च्या फोटोसमोर आसन टाकून बसण्याची जागा, जवळच जगन्माता पिंगलादेवीचा फोटो आणि त्यांना मिळालेले प्रासादिक देव, ती पुजेची जागा, त्या पवित्र स्थानाच दर्शन घेऊन मुख्य देवघरात परतलो. यावेळपर्यंत पाच वाजण्याचा सुमार झाला असेल. सोबत नेलेल्या श्री दत्तात्रेयाच्या मूर्तींची यथासांग पूजा करून पारायणाचा संकल्प केला आणि श्री गजानन महाराज, श्री नृसिंहसरस्वती व री रेणुका व पिंगला मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना करून पारायण यथासांग पार पाडून घ्यावे म्हणून विनंती केली, मातोश्रींना वंदन करून पारायणाला सुरूवात केली.
प्रथमाध्याही सर्व देवदेवतांना नमस्कार करूप जसे ग्रंथ रचना पार पाडण्यात ग्रंथकर्त्याने विनविले होते त्याच प्रमाणे त्यांच्याच वास्तव्याच्या जागेत बसून आम्हीही ग्रंथ पारायण निर्विघ्न पार पाडण्यास विनंती करीत होतो.  साखळी पारायण होते. ते त्यामुळे आम्ही अकोल्याहून गेलेले सहाजण एक एक दिवसाचे अध्याय वाचणार होतो. परंतू अशा पवित्रस्थळी आणि त्यांच्या प्रत्यक्ष सानिध्यात वाचनास बसावयाचे असल्यामुळे प्रथमपासूनच सर्वजण सोवळयातच त्या ठिकाणी बसून होते. ग्रंथ वाचन ऐकत होते. इतर बहुतेक सर्वजण त्याचवेळे पासून पवित्र आणि प्रासादिक वृक्ष औदुंबराला प्रदक्षिणा घालून अखंड नामस्मरण करीत होते. ''निष्काम कर्म करा अंती फळ मिळेलच मिळेल'' ह्या वचनाप्रमाणे लहान मोठी मंडळी त्या ठिकाणचे वास्तव्यात जास्तीत जास्त वेळ सदगुरूंच्या सेवेत घालवावा म्हणून घडपडत होते. श्री आप्पासाहेब शहाणे यांनी कल्पवृक्ष औदुंबराची यथासांग पूजा करून येण्यास पूर्वीच सांगीतले होते. त्याप्रमाणे ते पुजा करू लागतांच कृपावंत स्वामींनी प्रसादाचा वर्षाव वृक्षातही केला. सगळयांना अत्यानंद झाला. सकाळी 5-30 ची वेळ असावी भल्या पहाटे स्वामींनी प्रसाद देऊन नामगजर करण्याचा अजाण भक्तांचा आनंद द्विगुणित केला आणि वृक्षातही नामगजर जोर जोराने होऊ लागला ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ''
आम्हा अकोला निवासी भक्त मंडळीवर स्वामींनी प्रथम पासूनच कृपेची पाखर घातली होती, त्यांच्या कृपा छत्राखाली ज्याला जशी बुध्दी देतील तशी तो सेवाकरू लागला, कुणी गायत्री मंत्र जपत बसले, कुणी गुरूपदेशाचे स्मरण करीत बसले तर कुणी दत्तनामाचे संकीर्तन करीत वेळ मिळाला तो सार्थकी लावत होते. लहान लहान बालक पण अखंड प्रदक्षणा घालत होते. प्रसाद आला की खात होते, सूज्ञजण अल्पप्रसाद भक्षण करून बाकीचा शिल्लक ठेवीत होते, इतर ग्रामवासीयांना देण्याकरिता, प्रसाद टाकण्यात महाराज फेरफार करीत असल्यामुळे प्रत्येक वेळच्या मिळणा-या प्रसादाची गोडी आणि प्रकार निराळा असायचा, कधी खडी साखर तर कधी काजू तर कधी सफरचंदाच्या फोडी तर कधी किसमीस, सवृजण आनंदात नाचत गात होते, नामस्मरण करीत होते, या वेळपर्यंत सहाळ पासून 2 - 3 वेळा प्रसाद आला होता, अद्यापी पूर्ण दिवस जायचा होता. पहिल्या दिवसाचे इरलेले अध्याय पूर्ण झाले, श्री.अत्रे यांना दुस-या दिवसाचे वाचन करण्यास सांगितले असल्यामुळे सांगीतलेल्या पध्दती प्रमाणे त्यांनी आसपावर पदार्पण केलेल आणि त्यांना पुढील वाचन करण्यास अनुमती देऊन स्थानावरून दूर झालो. यावेळी आठ वाजण्याचा सुमार असेल. माहराजांच्या स्थानी विनम्र भावाने नमस्कार केला आणि कल्पवृक्ष औदुंबराच्या सेवेकरीता तिकडे निघालो.

 

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org